सुळे फाट्याजवळ ट्रक चालकाचा निर्घूण खून ; संशयीत चौकशीकामी ताब्यात

0

धुळे- शिरपूर तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील सुळे फाट्याजवळ एका ट्रक चालकाचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. अहमद वाजीद अली (55, रा.गंगावली, जि.संतकबीर नगर, उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या चालकाचे नाव आहे. लुटीच्या उद्देशाने हा खून झाल्याचा पोलिसांचा कयास आहे. रात्रीच्या वेळी ट्रक चालकाला अडवून त्याच्या खिशातील रक्कम व ऐवज काढत असताना चालकाने प्रतिकार केल्यानंतर भोसकून ठार मारल्याचा संशय आहे. या प्रकरणी तीन ते चार संशयीतांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेचे वृत्त कळताच जिल्हा पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत, धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली.

Copy