सुळे खडसे भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची मुंबई येथील घरी सदिच्छा भेट घेतली. यावेळी जळगाव जिल्ह्यातील राजकीय विषयांवर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई येथील निवासस्थानी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची भेट घेतली. यावेळी माजी आ.डॉ.गुरुमुख जगवाणी व शारदा खडसे उपस्थित होत्या. सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या या राजकीय तर्क-वितर्क लढविले जात असून जळगाव जिल्ह्यातील विषयांवर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.