सुळेलगत दुचाकींची जोरदार धडक : एकाचा जागीच मृत्यू

Heavy collision Of Two-Wheelers Next To A Pillar : One died on the spot शिरपूर : शिरपूर तालुक्यातील सुळे लगत रेस्ट हाऊस समोर दोन दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात 40 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी सायंकाळी घडला. दिलवरसिंग मुला पावरा (40, रा.लाकडा हनुमान, ता.शिरपूर) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

तालुका पोलिसात नोंद
लकड्या हनुमान येथील दिलवरसिंग मुला पावरा हे गुरुवारी 7.30 वाजेच्या सुमारास त्याचे ताब्यातील मोटारसायकलने जामण्यापाडा येथे जात असताना सुळे गावालगत रेस्ट हाउसजवळ समोरून येणार्‍या भरधाव दुचाकीनेत्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दिलवरसिंग पावरा यास गंभीर दुखापत झाल्याने त्यास धमेंद्र पावरा याने रात्री 9 वाजेच्या सुमारास शहरातील कॉटेज हॉस्पीटलमध्ये उपचारास दाखल केले असता डॉ.अमोल जैन यांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार सोनवणे करीत आहे.