सुरत व गोदान एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी मोबाईल लांबवले

भुसावळ : सुरत पॅसेंजरसह गोदान एक्स्प्रेसमध्ये प्रवासी झोपल्याची संधी साधत चोरट्यांनी मोबाईल लांबवले.

भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल
बाजीराव कालूराम मुघोडकर (रा.उपरखेड,जि. यवतमाळ) यांचा 14 हजार 700 रूपये किंमतीचा मोबाईल सुरत-भुसावळ पॅसेंजरमधून नंदुरबार-दोंडाईचा प्रवासादरम्यान 14 जून रोजी रात्री चोरीला गेला. दुसर्‍या घटनेत
गोदान एक्स्प्रेसमध्ून प्रवास करीत असलेल्या कुशल तिवारी (रा. विरापूर, प्रतापगढ, उत्तर प्रदेश) यांचा भुसावळ आऊटरला 21 हजार 800 रूपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी लांबविला.