सुरत मार्गावरील गाड्या पुन्हा धावणार

भुसावळ : रेल्वे प्रवाशांकडून मिळणार्‍या अल्प प्रतिसादाअभावी भुसावळ विभागातून धावणार्‍या आठ विशेष गाड्या (अप-डाऊन) पुढील सूचना मिळेस्तोवर 19 व 20 एप्रिलपासून पुढील सूचना मिळेस्तोवर रद्द करण्यात आल्या होत्यात. त्यात भुसावळ-सुरत मार्गावरील चार (अप-डाऊन) चार गाड्यांचा समावेश होता मात्र एकाच दिवसात रेल्वेने हा निर्णय फिरवला असून पुन्हा 20 पासून या गाड्या नियमीत धावणार असल्याचे रेल्वेने प्रशासनाने कळवले आहे.

चार विशेष गाड्या नियमित वेळेत धावणार
गाडी क्रमांक 09007 डाऊन सुरत भुसावळ विशेष गाडी तसेच गाडी क्रमांक 09008 अप भुसावळ-सुरत विशेष गाडी तसेच गाडी क्रमांक 09077 डाऊन नंदुरबार-भुसावळ विशेष गाडी व गाडी क्रमांक 09078 अप भुसावळ -नंदुरबार विशेष गाडी 20 एप्रिलपासून नियमीत धावणार असून प्रवाशांनी कृपया या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Copy