कोरोनाच्या नायनाटासह नागरीकांच्या दीर्घायुष्यासाठी साकडे

0

फैजपूरात हनुमान जन्मोत्सव साध्या पद्धत्तीने साजरा : पूरोहितांनी केली पूजा

फैजपूर : हनुमान जयंती उत्सव गावातील सर्वत्र चालत आलेली जुनी परंपरा आहे. दरवर्षी येथील पुरातन मोठा हनुमान मंदिरात पुरोहित एकत्र येऊन विधीवत पूजा सोहळा होमहवन, अभिषेक पूजा पाठ व आरती करण्याची करण्यात येते. यावेळी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने हा हनुमान जन्मोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी देशासह संपूर्ण जगावरील कोरोनविषाणू संसर्गजन्य महामरीच्या लढयात लवकरात लवकर यश मिळवून नागरीकांचे आरोग्य दिर्घायुषी होण्याची साकडे पुरोहितांद्वारे घालण्यात आले.

गोर-गरीबांना अन्नदान
शहरातील त्रिवेणी वाडा येथील हनुमान जन्मोत्सव निमित्त सकाळी 7 समिती अध्यक्ष वैभव वकारे यांच्या हस्ते आभिषेक करून आरती करण्यात आली.
तसेच समितीतर्फे गरीबांना अन्नदान वाटप करण्यात आले. तुषार किरंगे, मयुर बोरसे, उमेश वायकोळे, राकेश मिस्त्री, अक्षय परदेशी, दीपक कपले, योगेश सूर्यवंशी, आतिश परदेशी, रूपेश मिस्त्री, यश वर्मा यांनी परीश्रम घेतले.

Copy