सुरक्षा रक्षकाला रिव्हॉल्वरचा धाक दाखवुन जळगाव कारागृहातून तीन आरोपींचे पलायन

0

 

जळगाव : सुरक्षा रक्षकाला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून शनिवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास जिल्हा कारागृहातून पळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुशील अशोक मगरे (पहूर, ता.जामनेर), गोरव विजय पाटील रा.तांबापुरा, अमळनेर), सागर संजय पाटील (पैलाड’अमळनेर) असे पळालेल्या आरोपींची नावे आहेत.

सुशील मगरे हा पोलीस दलातून बडतर्फ झालेला आहे. पुणे येथील सराफ दुकानावर शस्त्रांचा धाक दाखवून त्याने दरोडा टाकला होता. अथक परिश्रमाअंती जीवाची बाजी लावुन जळगावच्या एलसीबीच्या पथकाने त्याला डिसेंबर २०१९ मध्ये बडोदा येथून अटक केली होती. आरोपी पळाल्याच्या या घटनेने जिल्हा कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे . सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात एक दुचाकीस्वार आधीच कारागृहाच्या बाहेर तिघांना घेवुन जाण्यासाठी उभा आहे. त्याच दुचाकीस्वारासोबत तिघेही कैदी एकाच चाकीवरून पसार झाल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. दरम्यान पोलिसांनी तिघांचे छायाचित्र जारी केले आहे. माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेने केले आहे .