सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल: भारतात मृत्यूदंडाची शिक्षा कायम राहणार !

0

नवी दिल्ली-ब्रिटेन, लॅटीन, ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर भारतातील मृत्यू दंडाची शिक्षा रद्द करण्यात यावी या मागणीवर सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण निर्णय दिला. भारतातील मृत्यू दंडाची शिक्षा रद्द करता येणार नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

सुप्रीम कोर्टात २:१ बहुमताने हा निर्णय झाला. न्या.कुरियन जोसेफ यांनी समीक्षा करण्याचे सांगितले. यावर न्या.दीपक गुप्ता आणि हेमंत गुप्ता यांनी मृत्यू दंडाची शिक्षा योग्य मानली.

छत्तीसगडमधील तिहेरी हत्याप्रकरणी एका आरोपीला मृत्यू दंडाची शिक्षा ठोठविण्यात आली आहे. आरोपी छन्‍नू लाल वर्मा यांना देण्यात आलेली शिक्षा कमी करण्यात यावी अशी मागणी सुप्रीम कोर्टात करण्यात आली यावेळी हा निर्णय देण्यात आला.