सुप्रीम कॉलनीत तलवार घेवून फिरणार्‍या तरुणाला अटक

Terror at sword point in Jalgaon : Accused in the net of local crime branch जळगाव : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी भागात असलेल्या रामदेव बाबा मंदिराजवळ तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण करणार्‍या तरुणाला
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. बुधवार, 23 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून समीर समशेर तडवी (20, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी रामदेव बाबा मंदिराजवळ एक तरुण बेकायदेशीररित्या हातात तलवार घेऊन दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाल. त्यानुसार त्यांनी पोलीस पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या, पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील, पोलीस नाईक किरण धनगर यांच्यासह पोलिसांनी दुपारी 2 वाजता कारवाई करत संशयीत आरोपी समीर समशेर तडवी (वय-20,) रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव याला अटक करीत चार हजार रुपये किंमतीची 28 इंच लांबीची तलवार हस्तगत जप्त करण्यात आली.

आरोपीविरोधात गुन्हा
याबाबत पोलीस नाईक किरण धनगर यांची फिर्यादीवरून संशयीत आरोपी समीर समशेर तडवी (वय-20) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील करीत आहे.