सुप्रीम कॉलनीतील तरुणाची आत्महत्या

The young man hanged himself as soon as the family came out of the house : incident in Jalgaon जळगाव : कुटुंबीय घराबाहेर पडताच जळगावच्या सुप्रीम कॉलनीतील 26 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी, 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विकास सुनील नरसाळे (26, अमित कॉलनी, पाण्याच्या टाकीजवळ, सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
विकास नरसाळे हा सुप्रीम कॉलनीतील पाण्याच्या टाकीजवळील परिसरात आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. गुरूवारी सकाळी विकासचे मोठा भाऊ कामावर निघून गेला तर वडील बाहेरगावी आणि आई बँकेत पैसे भरण्यासाठी गेल्याचे पाहून विकास नरसाळे याने राहत्या घरात सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास दोरीने गळफास घेतला. आई अनिलाबाई नरसाळे बँकेतून घरी आल्यावर मुलाने गळफास घेतल्याचे उघडकीला आले. मुलाचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. या घटनेची माहिती दिल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत विकासच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा परीवार आहे.