सुनेवर अत्याचार; दोघांना कोठडी

0

भुसावळ ।यावलच्या खाटीक वाडा भागातील विवाहितेवर अत्याचार प्रकरणी आरोपी सासरा शे. बाराती शे. सरदार खाटीक (वय 55) व शे. रमजान बाराती खाटीक यांना 11 मार्च रोजी भुसावळ न्यायालयात प्रथम वर्ग न्यायाधिश वराडे यांच्या समोर हजर करून युक्तीवाद झाला.

आरोपींना 16 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार तर्फे अ‍ॅड. नितीन खरे यांनी तर आरोपी तर्फे अ‍ॅड. मतिन अहमद यांनी काम पाहिले.