Private Advt

सुनेने बेदम मारहाण केलेल्या पाचोरा शहरातील सासर्‍याचा अखेर मृत्यू

पाचोरा : पाचोर्‍यातील तरुणासोबत चौथ्यांदा विवाहबद्ध झालेली अल्पवयीन तरुणी आपल्या पित्यासोबत पळून जाण्याच्या प्रयत्न होती व त्यासाठी सासरच्यांना तिने गुंगीचे औषध दिले मात्र त्याचवेळी सासर्‍याला जाग आल्याने त्यांच्यासह पती व सासुला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली होती व या प्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जखमी असलेल्या सासर्‍याचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला.

फसवणूक करणारी टोळी उघड
पाचोरा येथील कोंडवाडा गल्लीतील रहिवासी असलेल्या व सेंट्रींग काम करत असलेल्या राहुल अर्जुन पाटील यांचा विवाह धुळे येथील एक एजंटामार्फत एक लाख 75 हजार रुपये देवून (पाथरी, जि.परभणी) येथील साहेबराव सांडु म्हस्के यांच्या मुलीसोबत लावून देण्यात आला होता. 9 मार्चला विवाह झाल्यानंतर केवळ आठच दिवसात नवविवाहितेने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता व माहेरी मुलीला घेवून जातो म्हणून तिचे वडील साहेबराव सांडु म्हस्के देखील आले होते मात्र सासरच्या मंडळींनी तिला माहेरी नेण्यासाठी नकार दिल्याने तीन दिवस थांबून साहेबराव म्हस्के व त्यांच्या नवविवाहित मुलीने रात्री पळून जाण्याचा कट शिजवून 28 मार्च रोजी रात्री झोपण्यापूर्वी सासरच्यांना पाण्यात गुंगीचे औषध दिले मात्र मध्यरात्री दिड वाजता वडील व मुलगी पळून जात असताना अर्जुन उखा पाटील यांना अचानक जाग आल्याने त्यानी सुन व व्याह्यास हटकण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी राहुल पाटील, अर्जुन पाटील व त्यांच्या पत्नीस लोखंडी रॉडने मारहाण केली होती त्यात अर्जुन उखा पाटील हे गंभीर झाल्याने खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते उपचार घेत असतांना त्यांना शनिवारी सकाळी सात वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान मारहाण करणारी सून ही अल्पवयीन असल्याने तिची जळगावच्या बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली तिच्या वडीलांची जामिनावर सुटका झाली आहे.