सुनील फुलारी नाशिक परीक्षेत्राचे नूतन विशेष महानिरीक्षक

Sunil Phulari is now the Special Inspector General of Nashik Examination जळगाव : नाशिक परीक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी सुनील फुलारी यांची बदली करण्यात आली आहे. पुणे मोटार परीवहन विभागातील महानिरीक्षक पदावरून ते बदलून येत आहेत तर विद्यमान महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांची बदली करण्यात आली.

गृह विभागाने काढले बदल्यांचे आदेश
राज्यातील आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या असून गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी बदल्यांचे परीपत्रक जाहीर केले आहेत. काही अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या असून काही अधिकार्‍यांची पदस्थाना करण्यात आली. नाशिक परीक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी पुणे मोटार परीवहन विभागाचे महानिरीक्षक सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली. विद्यमान पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर हे वार्षिक तपासणीकामी जिल्ह्यात आले असतानाच त्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले आहेत.