सुधीर गाडगीळांसह डॉ. वर्णेकरांच्या चौफेर गप्पा रंगणार

0

भुसावळ : दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच रोटरी क्लब ऑफ भुसावळ यांच्या सयुक्त विद्यमाने गाडगेबाबा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये सुधीर गाडगीळ व जेष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. चंद्रगुप्त वर्णेकर हे श्रोत्यांशी चौफेर गप्पा मारणार आहेत. जगभरातील एकुणच तंत्रज्ञानातील बदल आपण अनुभवत असतांना या अफाट तंत्रज्ञान प्रगतीच्या मुळाशी असणारा भारतीय संस्कृतीचा संबंध व्याख्यानमालेच्या सहाव्या वर्षी शनिवार 7 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता ‘संस्कृत व तंत्रज्ञान’ या विषयाद्वारे डॉ. चंद्रगुप्त वर्णेकर हे उलगडून दाखवतील.

गाडगीळ साकारणार ‘मुलखा वेगळी माणसं’
सुप्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ हे रविवार 8 रोजी संध्याकाळी 5 वाजता ’मुलखा वेगळी माणसं’ आपल्या समोर घेवून येणार आहे. व्याख्यानमालेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. आर.पी. सिंह यांच्या मार्गदर्शानाखाली महाविद्यालयीन कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. व्याख्यानमाला प्रमुख म्हणून डॉ. गिरीश कुलकर्णी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. प्रमुख कार्यवाहक म्हणून प्रा. अनंत भिडे, प्रा. धिरज पाटील हे जबाबदारी पार पाडतील.

समितीत यांचा आहे समावेश
सजावट व रसिकांची बैठक व्यवस्था प्रा. राहुल चौधरी, प्रा. चित्तरंजन पाटील यांच्याकडे सोपवलेली आहे. प्रा.सचिन हरिमकर यांच्याकडे बस सुविधा तर प्रा. प्रफुल्ल वानखेडे, प्रा. अतुल गाजरे व अनिकेत पाठक यांच्याकडे नियोजन समिती आहे. पुस्तक प्रदर्शन समिती प्रा. किशोर चौधरी यांच्याकडे असेल. व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक हिंदी सेवा मंडळ अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव मधुलता शर्मा, प्राचार्य डॉ. आर.पी. सिंह यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रा. धिरज पाटील यांच्याशी संपर्क साधावा.