सुखद बातमी ! सहा वर्षीय बालिकेची कोरोनावर मात

0

रावेर : तालुक्यातील खानापूर येथील सहा वर्षीय बालिकेने कोरोनावर मात केली असून सोमवारी तहसीलदार उषाराणी देवगुणे, नोडल अधिकारी डॉ.एन.डी.महाजन यांच्या उपस्थितीत तिला निरोप देण्यात आला. यापूर्वीदेखील खानापुरच्या एका चिमुकलीने कोरोनावर मात केली होती तर सोमवारीदेखील एका सहा वर्षीय बालिकेने कोरोनावर मात केली आहे. नोडल अधिकारी डॉ.एन.डी.महाजन यांनी विशेष लक्ष दिल्याने आमची मुलगी कोरोनावर मात करू शकल्याची भावना तिच्या आई-वडीलांनी व्यक्त केली. अन्य 35 रुग्णांचे रीपोर्ट निगेटीव्ह त्यांनादेखील घरी सोडण्यात आले आहे.

रावेर शहरात 13 कंटेन्मेंट झोन
कोरोनापासून बचावासाठी रावेर शहरात 13 कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहे तर ग्रामीण भागात 27 कंटेन्मेंट झोन लावण्यात आले आहे. कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची वाढती संख्या पाहून विलगीकरणासाठी पर्यायी व्यव्यस्था बघत असल्याचे तहसीदार उषाराणी देवगुणे यांनी सांगितले.