सील्ड एअर इंडियाने केला ‘गरिमा स्कुल ऑफ हायजिनचा’ शुभारंभ

0

मुंबई । फॉरचून 500 हि कंपनी फूड प्याकेजिंग, खाद्य सुरक्षा आणि स्वच्छतेसंधर्बातील व्यवसायात कार्यरत आहे. या कंपनीने अलीकडेच मुंबईत आपल्या कौशल्य विकास अभियानाची अर्थात गरिमा डायव्हर्सी स्कुल ऑफ हायजिनचा शुभारंभ केला आहे. या शुभारंभाच्या वेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हिमांशू जैन आणि डॉकटर्स फॉर यु या संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक रविकांत सिंह उपस्थित होते.

स्वच्छतेबाबत केला गेला विकास
स्वच्छतेच्या पेशाला सन्मानित करत याच पेशाने स्वच्छ आणि सुंदर जीवन निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेऊनच कंपनीने गरिमा डायव्हर्सी स्कुल ऑफ अभियानाचा शुभारंभ केला आहे. हे अभियान समाजातील अत्यंत महत्वाच्या असणार्‍या स्वछतादूतांना परंतु उपेक्षित असलेल्या अशा घटकांना सन्मानित करून त्यांच्यामध्ये स्वच्छतेबाबत कौशल्य विकास व सुधारणा घडविण्यास मदत करणारा उपक्रम आहे. या अभियानाचा गरिमा हा शब्द म्हणजेच शान असा आहे. हे अभियान रोजगाराला चालना देतानाच स्वछता आणि साफसफाई उद्योगाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून विकसित करण्याचा प्रयत्न करणार आहे.