सीमेवर कुरापती काढणार्‍या १५ पाकिस्तानी जवानांसह ८ दहशतवाद्यांचा खात्मा

0

श्रीनगर – देश करोनाच्या संकटाला तोंड देत असताना पाकिस्तानकडून पुन्हा सीमेवर कुरापती सुरू झाल्या आहेत. पाकिस्तानमधून दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडतांना भारतीय लषष्कराने केलेलल्या गोळीबारात १५ पाकिस्तानी जवानांसह ८ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, २०० दहशतवादी सीमेपलीकडून काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिली होती. या माहितीच्या आधारे लष्कराने थेट केरन सेक्टरमधील सीमेपलीकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. यात १५ पाकिस्तानी सैनिकांसह ८ दहशतवादी जागीच ठार झाले.यात दूधनीलमधील किराणा मालाच्या दुकानांचही नुकसान झाले, असे या अहवालात म्हटले आहे. राजौरीतील पीर पांजल आणि जम्मू सेक्टरमधील परिस्थितीही केरन सेक्टर सारखीच आहे. या सेक्टरमध्ये सीमेपलीकडून ७० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या प्रतिक्षेत आहेत, गुप्तचर यंत्रणांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.

Copy