सीपीआय(एम) नेते माजी मंत्री श्यामल चक्रवर्तींचे कोरोनामुळे निधन

0

कोलकाता: पश्चिम बंगालचे सीपीआय(एम)चे वरिष्ठ नेते माजी मंत्री श्यामल चक्रवर्ती यांचा कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ७६ वर्षाचे होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. व्यापारी संघटनेचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने मुख्यमंत्री ममता बनर्जी आणि सीपीआयच्या नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी माजी खासदार, माजी मंत्री श्यामल चक्रवर्ती यांच्या निधनाने दु:खी असल्याचे सांगत शोक व्यक्त केला आहे.

श्यामल चक्रवर्ती १९८२ ते १९९६ तीन वेळा पश्चिम बंगालचे परिवहन मंत्री होते. दोन वेळा ते राज्यसभेवर निवडून गेले होते. श्यामल चक्रवर्ती यांची मुलगी उशसी चक्रवर्ती अभिनेत्री आहे.

Copy