Private Advt

‘सीडी’ नक्कीच लावणार ; मुंबईत माजी मंत्री खडसेंचा पुर्नउच्चार

मुंबई : माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशावेळी देवून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर खडसेंनी सीडी बाहेर काढावीच, असे आव्हान त्यांच्या विरोधकांनी अनेकदा त्यांना दिले मात्र सीडी बाहेर आली नाही मात्र आज बुधवारी मुंबईत पुन्हा खडसेंनी सीडीबाबत मोठे विधान केले आहे. खडसे म्हणाले, सीडी आपल्याजवळ असून योग्य वेळ आल्यावर ती आपण लावकरच असल्याचा इशारा त्यांनी देत खळबळ उडवून दिली आहे.

पेन डाईव्ह प्रकरणात ‘दूध का दूध’होईल
राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून विरोधकांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत महाराष्ट्र विधानसभेच्या सभागृहातच व्हिडिओ स्वरूपात पुरावे असलेला ‘पेन ड्राइव्ह’ सादर करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली होती. याबाबत माध्यमांनी खडसेंना छेडले असता ते म्हणाले की, विधानसभेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आश्वासन दिले असून दूध का दूध, पाणी का पाणी होईल, अशी सूचक प्रतिक्रिया दिली. जे काही तथ्य आहे ते लवकरच समोर येईल, असेही खडसे म्हणाले.

सीडी लावणार मात्र योग्य वेळ आल्यावरच !
पेन ड्राइव्ह बॉम्बनंतर ‘सीडी’ कधी येईल, ? असा प्रश्न माध्यमांनी विचारल्यानंतर खडसे म्हणाले की, सीडी लावेल, असे बोललो होतो मात्र कधी लावणार याचा टायमींग सांगितलेला नव्हता त्यामुळे आता सीडी लावण्याचा योग्य टायमिंग नाही त्यामुळे योग्य वेळ आल्यावर सीडी लावणारच असा पुर्नउच्चार खडसेंनी करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

विरोधकांना लगावला टोला
दाऊदशी संबंध जोडल्याने प्रसिद्धी मिळते, माझेही तशाच प्रकारे संबंध जोडले गेले, असा टोला माजी मंत्री खडसे यांनी विरोधकांना लगावला. पेन ड्राइव्ह प्रकरण गाजलं. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेतही सांगितले आहे की, दूध का दूध, पानी का पानी’ होईल. अशा प्रकारच्या सीडी, पेन ड्राइव्ह मी खूपदा बघितले आहेत. त्यामुळे त्याच्यातील तथ्य चौकशीअंतीच बाहेर येईल, असा टोला खडसे यांनी फडणवीस यांनी यावेळी लगावला.