सिव्हीलच्या घटनेप्रकरणी डीनसह सात जण निलंबीत

0

जळगाव – जिल्हा रूग्णालयात बेपत्ता झालेल्या कोरोना बाधित महिलेचा मृतदेह बाथरूमध्ये आढळुन आल्याप्रकरणी डीन डॉ. भास्कर खैरेंसह वैद्यकीय अधीक्षक आणि पाच प्राध्यापक यांना आरोग्य विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी तात्काळ निलंबीत केले असल्याची माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी दिली. यासंदर्भात खासदार उन्मेष पाटील यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडेही तक्रार केली होती. दरम्यान डीन म्हणून कोल्हापूरचे डॉ. सदानंद यांची नियुक्ती करण्याची मागणीही त्यांनी केली.