सिमी प्रकरणी पंचांच्या साक्षीवर युक्तीवाद

0

जळगाव । सिमी खटल्यातील दोन्ही संशयितांचे 1 डिसेंबर रोजी जबाब पूर्ण झाले. त्यानंतर 4 जानेवारी रोजी सरकारपक्षातर्फे युक्तिवादाला सुरुवात झाली. या प्रकरणी सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. के. पटणी यांच्या न्यायालयात सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी पंचांच्या साक्षीवर युक्तिवाद केला.

सिमी खटल्यातील संशयित आसीफ खान बशीर खान (वय 44), परवेज खान यांचे 1 डिसेंबर रोजी जबाब पूर्ण झाले. त्यानंतर 4 जानेवारी रोजी अंतिम युक्तिवादाला सुरूवात झाली. सोमवारी या प्रकरणी अ‍ॅड. ढाके यांनी या प्रकरणातील पंच 26 ते 30 क्रमांकाचे पंचांच्या साक्षीवर युक्तिवाद झाला. त्यात संशयितांच्या हस्ताक्षराचे पंच साक्षीदार होते. या प्रकरणी पुढील सुनावरी मंगळवारी होणार आहे.

घरफोडीतील संशयितास 19 पर्यंत पोलीस कोठडी
जळगाव । शहर पोलिस ठाण्यात 23 डिसेंबर 2014 रोजी दाखल घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयिताला विशेष पथकाने रविवारी सायंकाळी बी. जे. मार्केटमधून अटक केली होती. त्याला सोमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 19 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.राधाकृष्ण नगरातील सुनंदा भाऊसाहेब शितोळे (वय 52) यांच्या घरात 23 डिसेंबर 2014 रोजी घरफोडी झाली. त्यात चोराट्यांनी 1 लाख 61 हजारांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी शहर पोलिस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्यावेळी या प्रकणी पोलिसांनी अश्विन नवनीत मोरे याला अटक केली होती. मात्र उमेश हिरामण जाधव (वय 25) हा तेव्हापासून फरार होता. त्याला रविवारी विशेष पथकाने अटक केली. त्याला सोमवारी न्यायाधीश पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 19 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड. अनिल गायकवाड यांनी कामकाज पाहिले.