सिनिअर राष्ट्रीय आट्या-पाट्या स्पर्धेसाठी पूजा, विजय यांची निवड

0

जळगाव । महाराष्ट्र राज्य आट्या – पाट्या महामंडळ, नागपूर यांनी उस्मानाबाद येथे झालेल्या सिनिअर राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून हैद्राबाद येथे होणार्‍या सिनिअर राष्ट्रीय आट्या-पाट्या अजिंक्यपद स्पर्धेसाठी राज्याचा पुरुष व महिला संघाची यादी सचिव डॉ. दीपक कविश्‍वर यांनी जाहीर केले. त्यात जळगाव जिल्ह्यातील पूजा महाजन व विजय न्हावी यांचा समावेश राज्य संघात करण्यात आलेला आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल अध्यक्ष आमदार चंद्रकांत सोनवणे आमदार स्मिता वाघ, डॉ. प्रदीप तळलेकर, कबड्डी संघटनेचे अध्यक्ष श्याम कोगटा, उदय वाघ, अनिल माकडे, तायडे सर, अरुण श्रीखंडे, प्रताप कोळी, यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. 9 ते 12 मार्च 2017 पर्यंत हैद्राबाद येथे राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. संघटनेचे अ‍ॅड. सत्यजीत पाटील, डॉ. राजू फालक, सोनू मांडे, सुरेश स्वार, प्रा.डॉ. दिनेश पाटील, डॉ. प्रा. संजय चौधरी, गोरख सुर्यंवशी, प्रशांत जगताप, मिलिंद तळेले, पराग पाटील, इकबाल मिर्झा, प्रविण पाटील यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.