सिध्दीविनायक गृपचे चेअरमन, दै.जनशक्तिचे मुख्य संपादक कुंदनदादा ढाके यांचे दु:खद निधन

0

जळगाव: सिध्दीविनायक गृपचे चेअरमन तथा दै. लेवाशक्ति, दै. जनशक्तिचे मुख्य संपादक कुंदनदादा दत्तात्रय ढाके (वय ४२) यांचे आज पहाटे ६ वा. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुणे येथे निधन झाले. सोमवारी दि. २८ रोजी सायंकाळी ७ वा. भुसावळ येथे त्यांच्या निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघणार आहे. इलेक्ट्रीक इंजिनियअरींगचे शिक्षण घेतलेले कुंदनदादा ढाके हे मुळचे भुसावळ येथील रहिवासी असुन ते गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड येथे स्थायिक होते. वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षीच राजकीय, सामाजिक आणि बांधकाम व्यावसायिक क्षेत्रात स्वत:चे वलय निर्माण केले होते. अत्यंत मनमिळावू, प्रत्येकाच्या सुखदु:खात धावुन जाणे, सहकार्‍यांच्या अडीअडचणी सोडवणे असा त्यांचा स्वभाव होता. सिध्दीविनायक गृपच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात एक आगळावेगळा ठसा उमटविला होता. त्यांच्या अकाली जाण्याने सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Copy