Private Advt

सिगारेट पाकिटांची चोरी : अट्टल चोरटा धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात

धुळे : सिगारेट पाकिटांची चोरी करणार्‍या अट्टल चोरट्यास धुळे गुन्हे शाखेने अटक केली आहे. भिका सदा भोई (लोंढा नाला, अकलाड मोराणे, प्र.नेर, ता.जि.धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या घरातून 38 हजार 233 रुपयांची सिगारेट पाकिटे जप्त करण्यात आली.

दत्त मंदिर परीसरात फोडले होते दुकान
देवपूर दत्त मंदीर परीसरात नवतेज कॉम्प्लेक्समध्ये योगेश गोविंदा चिंचोले (42, जैतोबानगर, देवपूर, धुळे) यांचे ओम साईराम ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. या दुकानाचे शटर उचकावून 17 ते 18 रोजी मध्यरात्री चोरट्यांनी 40 हजार 150 रुपयांचे सिगारेट पाकिट लांबवले होते. या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

धुळे गुन्हे शाखेने केली अटक
सिगारेट पाकिटांची चोरी आरोपी भिका भोई याने केल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीच्या घरातून पोलिसांनी 38 हजार 233 रुपयांची सिगारेट पाकिटे जप्त केली. ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहा.निरीक्षक प्रकाश पाटील, हवालदार रफीक पठाण, राहुल सानप, गौतम सपकाळे, योगेश चव्हाण, राहुल गिरी, चालक सचिन पाटील आदींच्या पथकाने केली.