सिंधू होणार अधिकारी

0

हैदराबाद – रिओ ऑलिंपिक स्पर्धेतील भारताची रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आता आंध्र प्रदेशात उप जिल्हाधिकारी बनणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिला ऑलिंपिक पदकानंतर सरकारी सेवेचे आश्‍वासन दिले होते.

त्यानुसार त्यांनी तिला उप जिल्हाधिकारी या पदावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधूनेदेखील हा प्रस्ताव स्वीकारला असल्याचे तिची आई विजया यांनी सांगितले.