साहोच्या सेटवर श्रद्धा झाली बकासूर

0

मुंबई : प्रभास त्याच्या आगामी ‘साहो’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात प्रभाससोबत बॉलीवूडची बबली गर्ल श्रद्धा कपूर दिसणार आहे. श्रद्धा आणि प्रभास पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. श्रद्धा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटववरुन ‘साहो’ सेटवरचे बरेच फोटो शेअर करत असते. त्यातच तिने आता आणखी एक नवा फोटो शेअर केला. या फोटोत श्रद्धाच्या पुढे जेवणाचे बरेचसे डबे दिसून येत आहे.

हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीत सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असून श्रद्धाने तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधला एक फोटो शेअर केला आहे. साहो हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी मध्येही रिलीज होणार आहे.