साहेबावर 51 धावाची भारताची आघाडी

0

मुंबई – मुरली विजय कर्णधार विराट कोहलीच्या शानदार शतकी खेळीमुळे चौथ्या कसोटीत तिसर्‍या दिवसा अखेर भारताने साहेबांवर 51 धावाची आघाडी घेतली.तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार विराट कोहली 147 धावावर नाबाद होता.तर जयंत यादव 30 धावावर खेळत होता.भारताच्या संघाची धावासंख्या 451/7 अशी होती.

तिसर्‍या दिवसाची सुरवात 146/1 अशी झाली मात्र चेतेश्‍वर पुजाराला 47 धावा संख्येवर धावाबाद केले. या धक्क्यातून सावरण्यासाठी कर्णधार विराट कोहली याने मैदानात पदार्पण केले.विराट कोहली व मुरली विजय बरोबर चांगली फलंदाजी केली.भारताला सुस्थिती नेण्यासाठी दोन्ही फलंदाजाची 116 धावाची भागीदारी झाली असतांना व भारताची धावसंख्या 262 आली असतांना मुरली विजय वैयक्तिक 136 धावावर बाद झाला.त्याने आपले आलोचकांना शतकी खेळूत चांगले उत्तर दिले.यानंतर आलेले फलंदाज करण नायर13,तर विकेट क्रिपर व फलंदाज पार्थिव पटेल हा आपल्या फलंदाजीची जादू दाखवू शकला नाही तो 15 रनावर बाद झाला.तर आर.आश्‍विन याने गोलंदाजीत आपली जादू दाखविली मात्र तो फलंदाजीत पाहिजे तशी जादू दाखवू शकला नाही.तो शुन्यावर बाद झाला. तर रविद्र जडेजा ही गोलंदाजीत जादू दाखवून फलंदाजीत मात्र अवघ्या 25 धावावर बाद झाला. यानंतर आलेल्या जयत यादव याने कर्णधार विराट कोहली याला चांगली साथ दिली,तिसर्‍या दिवसा अखेर विराट कोहली 147 धावांवर,तर यादव 30 धावावर खेळत आहे.

अँडरसन 15-5-43-0,
वोक्स 8-2-34-0
अली 45-5-139-2
रशीद 44-5-152-2
बॉल 14-5-29-1
स्टोक्स 8-2-24-0
जो रुट 8-2-18-2