साहित्यातून मानवी संवेदनांचे प्रतिबिंब

0

जळगाव । जागतिक बदलांच्या काळात माणसे-माणसांपासून दुरावली जात आहेत. जग जवळ आले पण माणूस माणुसकीच्या सहज भावनेपासून लांब गेला. अशावेळी संवेदनशील मानवी समुदाय साहित्याकडे आशावादी नजरेने पाहत आहे. कारण साहित्यातून मानवी संवेदनांचे प्रतिबिंबन होत असते, असे मत प्रसिद्ध विचारवंत डॉ.विश्वास पाटील यांनी प्रकट केले. ते मूळजी महाविद्यालयातील हिंदी विभागाने ‘समकालीन कविता’ या विषयावर आयोजित उद् बोधन कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून बोलत होते.

डॉ. पाटील यांंनी याप्रसंगी वैयक्तिक, सार्वजनिक आणि राष्ट्रीय सहजीवनासाठी संस्कारक्षम समाज रचनेचा गरजेचा महत्व पटवुन दिले. त्या-त्या काळातील चिंता आणि चिंतनातून साहित्य निर्मित होते, असे साहित्य येणार्‍या काळासाठी पथप्रदर्शक ठरते असेही डॉ. पाटील यांनी सांगितले. काव्याने कधीच नकारात्मक विचारांना खत पाणी दिले नाही. त्यातून वर्तमान काळातील मानवी सुख-दुखांचे, जगण्यातील संघर्षाचे आणि सामाजिक-राजनैतिक विसंगतीचे यथातथ्य चित्रांकन झाले.हिंदी कवितांमध्ये दलित-शोषित,प्रताडीत, हैराण, दिग्भ्रमित माणसांचा उद् गार शोक हा काव्य श्लोक म्हणून प्रगटला झाला असल्याचे म्हटले आहे. त्यांनी गोरख पाण्डेयच्या ‘हम कानूनन समान हैं, स्वतन्त्र भी है… बड़े नजारों में , धन का यंत्र भी है….चाह रहे है हम जीना…पर घुट-घुटकर जीना भी क्या जीना है… या समकालीन हिंदी कविंच्या काव्य पंक्ति देखिल उदाहरणादाखल सांगितल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.ए.बी.पाटील यांनी काव्य रसिकाला काव्याच्या दोन ओळीतील अर्थाचे अंतर ओळखता आले पाहिजे. कारण कविता कवीच्या हृदयातून बाहेर आल्यावर ती वाचकाच्या हृदयात स्थानपन्न होत असते. हिंदीमधील वर्तमान साहित्यात आजची विसंगती आणि वास्तव व्यक्त होत आहे. त्यातले सत्य, शिव आणि सौंदर्य हे सामान्य व्यक्तींच्या जीवनाशी व संघर्षासोबत जुळलेले आहे. प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ.सुरेश तायडे यांनी केले. सूत्रसंचालन हिंदीचे प्रा.विजय लोहार यांनी तर आभार प्रा.मनोज महाजन यांनी व्यक्त केले.