सासरच्या त्रासााला कंटाळून मुक्ताईनगरात प्रौढाची आत्महत्या

मयताच्या भावाच्या तक्रारीनुसार पोलिसात गुन्हा : पोलिसांनी सुसाईड नोट केली जप्त : संशयीतांचा पोलिसांकडून शोध

Suicide of an adult in Muktainagar: Crime against five people including mother-in-law, teacher
मुक्ताईनगर :
सासरच्या जाचाला कंटाळून मुक्ताईनगरात भागवत गणसिंग पाटील (51, श्री कॉलनी, मुक्ताईनगर) यांनी मंगळवार, 16 रोजी पहाटेपूर्वी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून त्यात नावे लिहिल्याने सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्रास असह्य झाल्याने केली आत्महत्या
एस.टी.चालक शेषराव गणसिंग पाटील (41, मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीनुसार, सासु पुष्पाबाई विठ्ठल पाटील (अटाळे, ता.अमळनेर), आजल सासरे वसंत धनाजी चौधरी (जळगाव), शालक स्वप्नील विठ्ठल पाटील (अटाळे, ता.अमळनेर), अटाळे सरपंच सदा बापू, लहान साडू हनुमान पाटील (सुरत) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. उभयंतांनी शारीरीक व मानसिक त्रास दिल्याने त्यास कंटाळून छताला साडीने गळफास घेत भागवत पाटील यांनी आत्महत्या केली. तत्पूर्वी आत्महत्येचे कारण व त्यास जवाबदार असलेल्यांची नावे चिठ्ठीत लिहिल्याने ही चिठ्ठी पोलिसांनी जप्त करीत गुन्हा दाखल केला. तपास हवालदार महम्मद तडवी करीत आहेत.