सावळदेजवळील तापी नदीच्या पुलावरुन मालवाहतूक ट्रक पाण्यात

0

शिरपूर: मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील सावळदे येथे तापी नदीच्या पुलावरुन मालवाहतूक ट्रक पाण्यात पडल्याची धक्कादायक घटना शनिवारी, 20 रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. ट्रॅकमधून बटाट्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

इंदौरकडून बटाट्याने भरलेला माल वाहतूक ट्रक मुंबईकडे जात असताना मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे गावालगत तापी नदी पुलावर ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पुलाचे सुरक्षा कठडे तोडत थेट पाण्यात पडला आहे. घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पीएसआय सागर आहेर हे आपल्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. ट्रकमध्ये चालकासोबत आणखी किती व्यक्ती आहेत, याबाबत तपास करण्यात येत आहे. ट्रक पाण्यातून बाहेर काढण्यासाठी शर्तीचेे प्रयत्न सुरु आहेत.