सावधान! मी समाजाचा व मानवतेचा शत्रू आहे…

0

फैजपूर पोलिसांची नवीन आयडिया

फैजपूर(निलेश पाटील) : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू झाली आहे. पण तरी देखील काही महाभागांना परिस्थितीच गांभीर्य लक्षात येत नसल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागत आहे. तर फैजपूर पोलिसांची चांगलीच आयडिया लढवून या महाभागांना पकडून त्याच्या हातात “मी समाजाचा व मानवतेचा शत्रू मी विनाकारण घराबाहेर फिरत आहे”हे पोस्टर त्याच्या हातात देऊन फोटो काढत आहे यामुळे बाहेर फिरणाऱ्या महाशयांना चांगलाच धडा शिकवला जात आहे.

पोलिसांच्या या हटके प्रकारामुळे नागरिकांना कमीपणा वाटू लागला. आपला फोटो सगळीकडे पाठवला जाईल या भीतने जी लोकं सापडली त्यांनी बाहेर न पडण्याची हमी दिली. तर काही जणांच्या हातात ‘मी नालायक आहे, घरी जाणार नाही’ असे पोस्टर्स दिले होते. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसपासून दूर राहावे यासाठी लोकांनी घरीच राहावे, असं आवाहनही फैजपूर पोलिसांनी केलं आहे.

Copy