सावद्यात 43 वर्षीय इसमाची गळफास घेवून आत्महत्या

सावदा : शहरातील देवकरवाडा भागात भाड्याच्या घरात राहणार्‍या 43 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. सावदा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. भूषण दत्तात्रय महाजन (43, मूळ रा.खिर्डी, ता.रावेर) असे मयताचे नाव आहे. सावदा येथील देवकरवाडा येथे भूषण दत्तात्रय महाजन हे शरद कुरकुरे यांच्या घरात भाड्याने वास्तव्यास होते. शनिवार, 9 रोजी सकाळी 8 ते दुपारी 3.30 वाजेच्या दरम्यान त्यांनी घरातील छतास असलेल्या लोखंडी हुकाला नायलॉन दोरीने गळफास घेतला. हर्षल प्रकाश इंगळे (रा.खंडेराववाडी, फैजपूर ता. यावल) याच्या खबरीनुसार सावदा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहा.निरीक्षक डी.डी.इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश पाटील करीत आहेत.

Copy