सावद्यात 26 वर्षीय तरुणाची आत्महत्या

0

सावदा- शहरातील पाटीलपुरा भागातील व्यवसायाने चालक असलेल्या 26 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेपूर्वी घडली. घनश्याम उर्फ (गुड्डू) सुभाष पाटील (26) असे मयत तरुणाचे नाव आहे. घटनेचे वृत्त कळताच सावदा पोलिसांनी धाव घेत मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविछेदनासाठी हलवले. सावदा पोलिस ठाण्यात मयताचे विनोद प्रल्हाद पाटील यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार विनोद पाटील व सहकारी करीत आहे. दरम्यान, तरुणाने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. मयत तरुणाच्या पश्यात आई, बहिण, काका असा परीवार आहे. तो विनोद फोटोचे संचालक विनोद पाटील यांचा पुतण्या होय.