सावद्यात शिक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

0

सावदा- शहरातील मुख्याध्यापक पतीचे निधनानंतर पेन्शनचे कागदपत्रे मागण्यास शाळेत गेलेल्या महिलेस तेथील शिक्षकाने शिविगाळ करीत तिचा विनयभंग केल्याची घटना येथे 26 रोजी घडली. मुख्याध्यापक पतीच्या निधनानंतर त्यांच्या पतीच्या पेन्शनचे कागदपत्रे घेण्यासाठी पीडीता 26 रोजी सकाळी 11.30 वाजता येथील अँग्लो उर्दू शाळेत आल्यानंतर शिक्षक अय्युबखान दलमीरखान याने तु माझे विरुद्ध कोर्टात दिलेली फिर्याद काढून घे, असे म्हणत या महिलेस अश्लील शिवीगाळ केली तसेच विनयभंग करण्यात आला. पीडीत महिलेने सावदा पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर अय्युबखान दलमीरखानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Copy