सावद्यात चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री दोन दुकाने फोडली

0

सावदा- शहरात गेल्या काही दिवसांपासून भूरट्या चोरांनी धूमाकूळ घातला असून दुकाने फोडून रोख रक्कम लंपास लांबवली जात असल्याने व्यापार्‍यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. बसस्थानक परीसरातील पोलिस चौकीसमोरिल प्रवीण कम्युनिकेशन मोबाईल शॉपची कुलूपे तोडून चोरट्यांनी 16 हजारांची रक्कम लांबवली तर काही अंतरावर असलेल्या मधूप्रभा हॉस्पीटलशेजारील सुनील भोई यांच्या थंड पेय दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 13 हजारांची रोकड तसेच सात हजार रुपयांची सिगारेटची पाकिटे लंपास केल्याची बुधवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. शहरातील महिन्याभरात चोरीची ही पाचवी घटना आहे. मंगळवारी म्हाळसादेवी मंदिरातील मूर्ती लांबवण्याची घटना ताजी असतानाच सातत्याने चोर्‍या होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.