Private Advt

सावद्याच्या दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

उभ्या डंपरवर दुचाकी धडकली : सावद्याच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

सावदा : रावेर मार्गावरील हॉटेल कुंदनजवळ उभ्या असलेल्या डंपरवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात सावद्यातील 60 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री हा अपघात झाला. या अपघातात लक्ष्मण पाटील (60, गवत बाजार, सावदा) यांचा मृत्यू झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, हॉटेल कुंदनजवळ अंधार्‍यात इंडिकेटर न देता डंपर (एम.एच.19 सी.वाय.- 4876) उभे असल्याने दुचाकी (एम.एच.19 सी.एल.7257) त्यावर आदळल्याने लक्ष्मण पाटील यांचा मृत्यू झाला तर दुचाकीचे मोठे नुकसान झाले. अपघात प्रकरणी भूषण पाटील यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार उमेश पाटील करीत आहेत.