Private Advt

सावद्याचा पाणीपुरवठा 17 जानेवारीपासून बंद

सावदा : शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन सावदा रेल्वे स्टेशन जवळील पुलाखाली लिकेज झाली असून पाईप-लाईनचे दुरुस्तीच्या कामकाजाला सोमवार, 17 जानेवारीपासून करण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामानिमित्त शहराचा पाणीपुरवठा पाच ते सहा दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. नागरीकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा व पाण्याचा वापर काटकसरीने करून नगरपरीषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी केले.