सावदा शहरात त्वरीत ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी

सावदा : शहरात दररोज वाढणारी रुग्ण संख्या पाहता शहारासाठी सुमारेे 5 ते 10 ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी सावदा शहर शिवसेने तर्फे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. आमदार चंद्रकांत पाटील, मुक्ताईनगर यांना ऑनलाइन पद्धतीने पाठविण्यात आले यात कोविंड रूग्णांकरिता आमदार निधीतून सावदा शहरात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली. मुक्ताईनगर मतदार संघात सावदा हे एकमेव नगरपालिका असलेले शहर असून शहरात नगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने काही रुग्ण घरीच उपचार होत असतात तर काही दवाखान्यात उपचार होत असतात.

तातडीने ऑक्सीजन सिलिंडर पुरवावेत
नगरपालिका क्षेत्रात रुग्ण संख्या वाढत असून ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्याने आपण मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार असून सावदा शहरासाठी सावदा शहरातील रुग्णांकरीता आपल्या निधीतून किंवा इतर निधितून ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन दिल्यास रुग्णांचे प्राण वाचविण्यात उपयुक्त ठरेल. 14 रोजी हे पत्र पाठवण्यात आले असून शिवसैनिकांच्या पत्राचा विचार करून शहरासाठी पाच ते दहा ऑक्सिजन सिलेंडर तत्काळ उपलब्ध करु द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर शिवसेना शहरप्रमुख भरत वसंत नेहेते, उपतालुका प्रमुख धनंजय वासुदेव चौधरी, शाम वसंत पाटील, तालुका क्षेत्रप्रमुख मिलिंद सुरेश पाटील, सचिव शरद गिरधर भारंबे, गौरव दिलीप भेरवा आदींच्या स्वाक्षर्‍या आहे.

Copy