सावदा शहरात अखेर लसीकरण सुरू

सावदा : सावदा शहरात गत महिन्यात कोव्हक्सीन लस ग्रामीण रुग्णालयाय उपलब्ध झाल्याने येथे लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती मात्र काही दिवसांपूर्वी हे लसीकरण लसी उपलब्ध नसल्याने थांबले होते यामुळे पहिल्या व दुसर्‍या डोस साठी नागरीक प्रतीक्षा करीत होते याबाबत दै.जनशक्ती ने वृत्त प्रसिध्द केले होते. याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीदेखील येथे त्वरीत लस पुरवठा होईल असे सांगितले होते. दरम्यान, वृतांची दखल घेऊन सावदा येथे लस उपलब्ध होऊन लसीकरण सुरू झाले असून यास नागरीकांचा प्रतिसाद लाभत असून लस घेण्यासाठी नागरीकांची गर्दी झाली आहे तसेच दुसरा डोस घेणारे नागरीकांची चिंता देखील दूर झाली आहे.