Private Advt

सावदा-पिंपरूड रस्त्यावर अपघात : वर माय जागीच ठार, पाच जण जखमी

सावदा (दीपक श्रावगे) : सावदा-पिंपरूड रस्त्यावर भरधाव फॉर्च्युनर व इंडिका वाहनात समोरा-समोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात वर माय असलेली 48 वर्षीय विवाहिता जागीच ठार झाली तर पाच जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडला. या अपघातानंतर वाघोदा येथील लग्न घरी शोककळा पसरली आहे. भावना भरत सुपे (48, वाघोदा) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव असून त्या माजी उपसभापती भरत सुपे यांच्या पत्नी होत. दरम्यान, मयत भावना सुपे यांच्या मोठ्या मुलाचे नुकतेच लग्न झाले असून 5 डिसेंबर रोजी सावदा येथे रीसेप्शनची तयारी सुरू असतानाच अपघाताचे वृत्त धडकल्याने लग्न घरी शोककळा पसरली.

भीषण अपघातात फॉर्च्युनरचा चक्काचूर
सावदा येथून जवळ असलेल्या मोठा वाघोदा येथील रहिवासी व माजी उपसभापती भरतशेठ वसंतराव सुपे यांचा मोठा मुलगा अक्षयचे नुकतेच लग्न झाले असून 5 डिसेंबर रोजी सावदा येथे रीसेप्शन असल्याने खरेदीनिमित्त कुटुंबातील सदस्य गुरुवारी सकाळी फॉर्च्युनर (क्रमांक डी.एल.10 ए.6165) ने जळगावी जात असताना सावदा-पिंपरुड (आमोदा-भिकनगाव हायब्रीड रस्त्यावर) दरम्यान भरधाव फॉर्च्युनरची समोरून येणार्‍या इंडिका (क्रमांक एम.एच.19 पी.2612) यांच्यात जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की फॉर्च्युनर गाडी झाडावर आदळल्यानंतर शेतात शिरली. या भीषण अपघातात भावना भरत सुपे (40, रा.वाघोदा) यांचा जागीच मृत्यू झाला तर विद्या काशिनाथ (गोटुशेठ) सुपे व मुलगा कृष्णा भरत सुपे (मोठे वाघोदा) यांच्यासह इंडिका वाहनातील प्रवासी व रावेर येथील व्ही.एस.नाईक विद्यालयाचे चेअरमन यांच्या परीवारातील रेखा हेमंत नाईक (40), प्रतीक हेमंत नाईक (20), प्रीती हेमंत नाईक (18, रा.रावेर) असे पाच जण गंभीर जखमी झाले आहे.

लग्नघरी पसरली शोककळा
वाघोदा येथील प्रख्यात केळी व्यापारी व समाजसेवक भरतशेठ सुपे यांचा मोठा मुलगा अक्षयचा नुकताच धूमधडाक्यात विवाह समारंभ झाला व सावदा येथे लग्नानिमित्त 5 डिसेंबर रोजी रीसेप्शनचा कार्यक्रम असल्याने समारंभाची जोरदार तयारी सुरू होती मात्र कु्रर काळाने अपघातरूपी झडप घातल्याने वाघोद्यातील सुपे परीवारावर शोककळा पसरली.