सावखेड्यातील तरुणाचा ट्रॅक्टरवरून पडल्याने मृत्यू

A young man from Sawkheda died after falling from a tractor जळगाव :  वाळूच्या ठेक्यावर कामावर असलेल्या तरुणाचा ट्रॅक्टरवरून पडल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना सावखेडा गावात सोमवार, 19 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कृष्णा विजय सोनवणे (26, सावखेडा) असे मयत तरुणाचे नाव आहे.

ट्रॅक्टरवरून पडताच मृत्यू
जळगाव तालुक्यातील सावखेडा येथे कृष्णा सोनवणे हा वडील विजय सोनवणे आणि आई संगीता सोनवणे यांच्यासह वास्तव्याला होता. कृष्णा हा वाळूच्या ठेक्यावर कामाला होता. सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास कृष्णा सोनवणे हा वाळूच्या ट्रॅक्टरवर गेल्यानंतर सावखेडा गावाच्या बाहेर ट्रॅक्टरवर काम करत असतांना तो ट्रॅक्टरवरून खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.खानेता पठाण यांनी मयत घोषीत केले.

चार वर्षांपूर्वी भावाचादेखील झाला मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. चार वर्षांपुर्वी कृष्णाच्या मोठ्या भावाचेदेखील अपघाती निधन झाल्याच्या सांगण्यात आले. मयत तरुणाच्या पश्चात आई संगीता, वडील विजय खंडू सोनवणे आणि विवाहित बहिण असा परीवार आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास हवालदार सतीश हारनोळ करीत आहे.