सावखेडा भैरवनाथ मंदिर संस्थानात कुस्त्यांची दंगल उत्साहात

0

वरखेडी । येथून जवळ असलेल्या सावखेडा येथे श्री भैरवनाथ बाबा यात्रोत्सवनिम्मित भैरवनाथ मंदिर संस्थान पंच कमेटीतर्फे कुस्तीची दंगल उत्साहत पार पडली. योवळी मान्य वराच्या हस्ते कुस्ती आखाड्याचे पूजन करण्यात आले. यानंतर कुस्त्याची दंगल सुरु झाली. यावेळी आमदार किशोर पाटील यांच्याहस्ते 4100 रुपयेची अंतिम जोड भैय्या पाटील वडगाव व संदीप पाटील सिल्लोड यांच्यात लावण्यात आली. अंतिम लढत शेवटी पंचानी हि लढत थांबवून दोघांना सयुक्तीक बक्षीस वाटून दिली रामदास हटकर व मोतीलाल परदेशी यांच्या हस्ते आखाडा पूजन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी संस्थान चेअरमन व सरपंच किरण पाटील, माजी पोलीस पाटील, संजय परदेशी, माजी सरपंच गोकुलसिंग भैय्या परदेशी, प्रकाश मोची, पिताबर पाटील, संजय सोनवणे, जि.प.सदस्य शांताराम पाटील, सुदाम परदेशी, एकनाथ पाटील, जगन पाटील, संजय परदेशी, प्रकाश परदेशी समस्त सावखेडा बु ॥ सावखेडा खु ॥ व पंचक्रोशीतील ग्रामस्थांची उपस्थिती होती. कायदा व सुव्यवस्था ठेवून कार्यक्रमशांतेत पर पडला या साठी पो.नि.संदीप पाटील यांच्या मर्गदर्शनाखाली हे.कॉ रामदास चौधरी, निव्रती मोरे, पोलीस समस्त होमगार्ड, पोलिस पाटील ज्योती परदेशी, संजय परदेशी व भैरवनाथ संस्थेचे पंचमंडळ यांनी परिश्रम घेतले. यावेळच्या कुस्तायाचे वैशिष्ट म्हणजे प्रथमच पुरुषांच्या कुस्ती आखाड्यात कुर्‍हाड येथील आश्विनी तेली व लोहरा येथील आरती शिंदे या तरुणींची कुस्तीची जोड लावण्यात आली. यात आश्विनी तेली हिने आरती शिंदे वर मत केली.