सालदारांचे शक्ती प्रदर्शन!

0

नंदुरबार । शहरातील माळीवाडा भागात यंदाही वजनदार दगड उचलून सालदारांनी शक्ती प्रदर्शन दाखविले. अक्षयतृतीया निमित्त दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो. माळीवाडा हा परिसर बहुतांश शेतकरी कुटुंबियांचा आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी सालदार ठरविण्याची प्रथा येथे आहे.

या दिवशी दगड उचलून सालदार आपली क्षमता दाखवित असतो. जो व्यक्ती जास्त वजनाचा दगड उचलून दाखवितो त्याचे त्याप्रमाणे वर्षाचे वेतन ठरविले जाते. या वेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी, माणिक माळी जगन माळी, रघुनाथ माळी यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.