सारथी कायम ठेवू; संस्थेसाठी ८ कोटींचा निधी: अजित पवारांची घोषणा

0

मुंबई: मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या सारथी संस्थेसाठी ८ कोटींची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. आज सारथीची बैठक मंत्रालयात घेण्यात आली. बैठकीनंतर अजित पवार यांनी सारथी संस्थेसाठी ८ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. बैठकीला छत्रपती संभाजीराजे यांच्यासह मराठा समाजाचे समन्वयक उपस्थित होते.

सारथी संस्थेचे महत्त्व कायम ठेवण्यात येणार असून ती बंद पडू देणार नाही असे आश्वासनही अजित पवार यांनी दिले.

Copy