Private Advt

सायगावजवळ वाळूची चोरटी वाहतूक : वाहन जप्त

चाळीसगाव : अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे पिकअप वाहन चाळीसगाव तालुक्यातील सायगाव जवळील मन्याड नदीच्या पुलावर जप्त करण्यात आले. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अवैध वाळू वाहतूक ऐरणीवर
चाळीसगाव तालुक्यातील सायगाव गावात मन्याड नदीच्या पुलावर ट्रॅक्टर चालक मयूर राजेंद्र पाटील (पिलखोड, ता.चाळीसगाव) हा विना क्रमांकाच्या पिकअप वाहनात विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करताना मेहुणबारे पोलिस ठाण्याचे नाईक अन्वर तडवी आढळल्यानंतर त्यांनी वाळू वाहतुकीबाबत परवाना विचारला असता उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने वाहन जप्त करून पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी नाईक अन्वर तडवी यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक मयूर पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक दीपक नरवाडे करीत आहे.