सामूहिक बलात्कारातील आरोपी ताब्यात

0

भुसावळ । तालुक्यातील साकेगाव येथील रेल्वे उड्डाण पुलाखाली एक अल्पवयीन मुलगी आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी गेली असता त्यावेळी तेथे अचानक चार अनोळखी इसमांनी तिला जबरदस्ती करुन तिला पुलाचे खाली नेऊन त्यापैकी दोघांनी तिच्यावर अत्याचार केल्याची घटना 21 रोजी संध्याकाळच्या सुमारास उडकीस आली होती. यासंदर्भात पोलीसांनी लागलीच तपासचक्रे फिरवीत गुन्हा दाखल झाल्यापासून सहा तासात आरोपींना जेरबंद केले. जेरबंद केलेले चारही आरोपी हे अल्पवयीन असल्यामुळे त्यांना बाल न्याय मंडळात रवानगी करण्यात आली आहे. घटनेचे गांभिर्य पाहून एसपी डॉ. जालिंदर सुपेकर, अप्पर पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, डिवायएसपी निलोत्पल यांनी बाजारपेठ पोलीसात ठाण मांडले होते.

चौघांनी केला अत्याचार
शहरातील 13 वर्षीय युवती ही आपल्या मित्रासोबत फिरण्यासोबत गेली असता रेल्वे उड्डाण पुलाजवळ चार अनोळखी युवकांनी येऊन या तरुणीला पुलाखाली नेऊन तिच्यावर जबरीने अत्याचार केला. याबाबत या पिडीत तरुणीने बाजारपेठ पोलीस स्थानकात 21 रोजी तक्रार दिली होती. त्यानुसार बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्या अतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात तपासणी करण्यासाठी नाशिक येथून फॉरेंसिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी घटनास्थळावर जावून महत्वाचे पुरावे ताब्यात घेतले. तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. सुपेकर यांसह अप्पर पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, डिवायएसपी निलोत्पल यांनी घटनास्थळावर जावून जागेची व घटना घडली कशी याची संपुर्ण माहिती गोळा केली. यासंदर्भात तरुणीने सांगितलेल्या माहितीनुसार चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना जळगाव येथील बाल सुधार कारागृहात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास बाजार पेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरिक्षक मनोज पवार करित आहे. घटनेचे गांभीर्य पाहून एस.पी सुपेकर यांनी रात्री कर्मचार्‍यांना आरोपी ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या होत्या.आरोपीचे वर्णन फक्त पोलिसांकडे होते.त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्रीच आरोपींना ताब्यात घेतले.आरोपीना अटक करण्यासाठी पोलिस पथकात सपोनि मनोज पवार, सपोनि सारिका खैरनार, उपनिरक्षक आशिष शेळके, उपनिरिक्षक नरेंद्र साबळे, उपनिरिक्षक मनोज ठाकरे, सहाय्यक फैजदार रफि योद्दीन काझी, हेकॉ माणिक सपकाळे, मोहम्मद अली, छोटू वैद्य, संजय भदाणे, संजय पाटील ,सुधीर विसपुते, किशोर महाजन, प्रशांत चव्हाण, निलेश बाविस्कर, यांचा समावेश होता. यासदर्भात एस.पी डॉ. सुपेकर याच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या घटनेतील आरोपीची अल्पशा माहितीवरून त्यांना कर्मचार्यांनी अटक केली.तसेच आमच्याकडे महत्वाचे पुरावे हाती लागले आहे. प्रथमच अशा घटनेत घटनास्थळावर जावून फॉरेंसिक व्हॅन सह तज्ञांनी पुरावे गोळा केलेले आहे.