सामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा

0

जळगाव: सामुहिक शौचालय अभियान (एसएसए) अंतर्गत जिल्ह्याने संपूर्ण देशात तृतीय क्रमांक पटकाविला आहे. जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. यासाठी जिल्हाच २ ऑक्टोंबर रोजी देशपातळीवर सन्मान होणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाने राबविलेल्या स्पर्धे दरम्यान जिल्ह्याला उत्कृष कामगिरी केल्याने स्नापूर्ण देशातून जिल्हाने तिसरा क्रमांक मिळविला आहे. त्यासाठी गांधी जयंतीला सन्मान होणार आहे. केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बक्षीस वितरण होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे उपस्थित राहणार आहेत. १५ जून ते १५ सप्टेंबर २०२० या तीन महिन्यांच्या कालावधीत हा अभियान राबविण्यात आला.

या उपक्रमात ग्रामीण भागात सार्वजनिक शौचालय बांधकाम व त्याच्या वापर, रंगरंगोटी, पाणी व विजेची उपलब्धता अशा बाबींचा विचार करण्यात आला होता. या कामांचे जिओ टॅगिंग करण्यात आले होते. या अभियानात सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी, गट संसाधन केंद्रातील गट/समूह समन्वयक, जिल्हा कक्षातील तज्ञ/सल्लागार यांनी या कालावधीत उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. याबद्दल विभागाचे कौतुक होत आहे.

Copy