सामुदायिक विविध सोहळ्याचा खर्च टाळून वधू-वरांना गृहपयोगी वस्तुंची भेट

0

चाकण : पिंपरी बुद्रुक-पाँईट या जिल्हा परिषद गटातील सर्व स्तरातील नागरिकांनी आपल्या मुला-मुलींचे करणार्‍या गरीब कुटुंबातील वधू-वरांना गृहपयोगी वस्तू व वधूचे वडिलांना रोख मदत करण्याची योजना शरद बुट्टेपाटील मित्र मंडळाने सुरू केली आहे. यामुळे समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण झाला आहे. लग्न समारंभारत अनेक वधू-वरांचे कुटुंब लाखो रूपये खर्च करत असल्याची उदाहरणे आपण रोजच पहातो. परंतु गरीब कुटुंबातील नागरिक कर्ज काढून लग्न करतात. त्यावेळी संपूर्ण हयात कर्ज फेडण्यात खर्च होते. नेमका हाच धागा पकडून जिल्हा परिषदेचे सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी या उपक्रमास सुरुवात केली आहे. नुकतेच भांबोली वंजीरा ठाकरवाडी येथे झालेल्या कडाळे जाधव या आदिवासी ठाकरवाड्यांमधील ठाकर समाजाचे लग्नापासून योजनेची सुरुवात केली.

गरीब कुटुंबांना लग्नात थेट मदत
योजनेचे प्रवर्तक जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील, पंचायत समितीचे सदस्य चांगदेव शिवेकर, काळुराम पिंजण यांचे हस्ते 51 गृहपयोगी भाड्याचा संच वधू-वरांकडे सुपूर्द करण्यात आला तर वधूचे वडील युवराज कडाळे यांना 5000 रूपयांचे आर्थिक सहकार्य क रण्यात आले. शरद बुट्टेपाटील म्हणाले की, आम्ही गेली 11 वर्षे 1 मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा केला परंतु बदलत्या परिस्थितीत सोहळ्याला खर्च मोठा व लग्न कमी यामुळे खर्च बचतीचा हेतू साध्य होत नसल्याने सोहळा बंद करून गरीब कुटूबांना लग्नात थेट मदत क रण्याची योजना सुरू केली आहे.

मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत
सर्व समाजातील कुटुंबांना मदत करण्यासाठी भामा खोरे सहाय्यता निधी संकलित करीत असून लग्नाला सहकार्याबरोबर मुलींचे शिक्षण व संकटकाळातील (जळीत, अपघात) कुटुंबांना तातडीचा आर्थिक आधार देण्याचा आमचा मानस आहे. समाजासाठी काही विधायक करू पाहणार्‍यांनी या योजनेला सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले. शरद बुट्टेपाटील मित्र मंडळाचे कार्यकर्ते निधी संकलित करीत असून निधी संकलनाची सुरुवात म्हणून शरद बुट्टेपाटील यांनी 1 लाख रूपये तसेच चांगदेव शिवेकर, आंबेठाणचे सरपंच दत्ता मांडेकर, सुरेश पिंगळे, संजय रौंधळ, काळुराम पिंजण, प्रदीप नवरे, गोविंद घाटे, बाळासाहेब पवार, प्रदीप सांळुके, मोहन पवार, भानुदास बुट्टेपाटील, गणेश पवार, संतोष कड, शिवाजी डावरे, सुनील देवकर, दत्तात्रय टेमगिरे, आबा सांड़भोर, विकास ठाकूर, अरूण भोकसे यासह अनेक कार्यकर्ते यासाठी आर्थिक सहकार्य करत आहेत. गरिबांसाठी चांगली योजना सुरू केल्याबद्दल युवराज कडाळे, अंकुश कडाळे, संजय सप्रे या आदिवासी ठाकरवाड्यांमधील कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.