‘सामाजिक परिवर्तन’ अंतर्गत नवापूर तालुक्यातील पाच गावे आदर्श होणार

0

नवापूर। गा व सामाजिक परिवर्तन अंतर्गत नवापूर तालुक्यातील पाच गावे आदर्श होणार आहेत. भादवड, बिजगाव, बोरचक, निभोंणी, वाटवी या गावांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेली पाच गावे देशात आदर्श ठरतील अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात कायापालट होणार आहे. या आदिवासीबहुल भागातील गावाचा शाश्वत विकासासह गावे सक्षम बनविण्याचा मुख्यमंत्रीचा हेतू आहे. त्याअनुषांने नंदुरबार जिल्ह्यातील टीम कामाला लागली आहे.यात शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, कृषी, ग्राम विकास, रोजगार, शासकीय योजना आदी महत्त्वाचा घटकांवर विचार करण्यात आला आहे. एका वर्षात गावे आदर्श होणार आहेत. ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशन अंतर्गत पाच गावाची देशात वेगळी ओळख निर्माण होणार आहे. यावर थेट मुख्यमंत्री कार्यालयाचे नियंत्रण राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी जनशक्तिशी बोलतांना दिली.

नाविन्यपूर्ण संकल्पना
ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशन’ हि एक नाविन्यपूर्ण संकल्पना आहे, ही योजनेंतर्गत गावे देशात आदर्श ठरतील अशी राहणार आहे. पहिल्या टप्प्यात एका वर्षात 100 गावे आदर्श करणार आहेत तर दुसर्या टप्प्यात एक हजार गावाचा समावेश राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.ज्यामध्ये ग्रामीण महाराष्ट्रात आमूलाग्र बदल घडवून येणार आहेत. गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा आणि सेवा प्रदान करून आदिवासी व ग्रामीण भागांना शाश्वत विकासासाठी सक्षम व स्वयंपूर्ण करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख हेतू आहे. यासाठी राज्यातील खाजगी संस्थांच्या आर्थिक व तांत्रिक सहकार्य करणार आहेत.

नवापूर तालुक्यात पाच गावात ग्रामदूत 6 मे पर्यंत प्राथमिक सर्व्हे करणार त्याची माहिती गोळा करून मुख्यमंत्री कार्यालयात सादर केली जाईल त्यानंतर प्रशिक्षण दिले जाईल मग दोन महिन्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल एका वर्षात गाव आदर्श होईल.या पाच गावाप्रमाणे अन्य गावांची देखील विकास झपाट्याने केला जाईल.
नंदकुमार वाळेकर, गटविकास अधिकरी, नवापूर.

फेलो करणार काम
मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील नंदुरबार जिल्ह्यातील पाच गाव शासन व हिंदुस्थान युनिलिवर लिमिटेड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने मॉडेल होणार आहेत यासंदर्भात गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर,तहसीलदार प्रमोद वसावे, ग्रामपंचायत सरपंच,ग्रामसेवक,तलाठी, कृषी सहाय्यक यांची नुकताच बैठक झाली. यात जिल्हाधिकारी डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मार्गदर्शन केले. यासाठी ग्रामदूतांची टीम तालुक्यात प्राथमिक सर्व्हे करण्यासाठी दाखल झाली आहे. गावांमध्ये ग्रामीण विकास कार्यक्रमाच्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित गावामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या फेलोची असेल.