सामाजिक जागरासाठी प्रबोधनाची आणि युवा चैतन्याची सांगड गरजेची

0

जळगाव । सामाजिक जागरासाठी प्रबोधनाची आणि युवाचैतन्याची सांगड घालणे गरजेची आहे. चहुबाजूला चित्र आहे की, माणसाच्या संवेदना बोथट होत आहेत, सामाजिक समस्या बिकट झालेल्या आहेत, त्यातून मार्ग काढण्याचे उपाय शोधले जातायेत. असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.सत्यजित साळवे यांनी केले. नीर फाउंडेशन आणि महात्मा गांधी अध्ययन केंद्र, मूळजी जेठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उमविस्तरीय फिरती पथनाट्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्या ते बोलत होते.

युवक हे परिवर्तनाचे वारकरी
डॉ. सत्यजित साळवे पुढे बोलतांना म्हणाले की, समाजाने युवकांकडे आशावादी दृष्टीने पाहिले पाहिजे, त्यांच्यातील अक्षय उर्जेविषयी शंका घेता कामा नये. कारण युवक हे परिवर्तनाचे वारकरी असतात. त्यांच्याकडे विषयाच्या अथवा समस्यांच्या उकलाची क्षमता असते. त्यांच्याकडे चैतन्याचा अपरिमित साठा असतो, गरज असते फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची आणि प्रोत्साहन देण्याची. असे विचार त्यांनी व्यक्त केले.

चार विषयांवर पथनाट्य सादर
जागर अभियान-2017 च्या अंतर्गत महात्मा गांधी अध्ययन केंद्र, मू.जे.महाविद्यालय आणि नीर फाउंडेशन यांच्या वतीने उमविस्तरीय फिरती पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन मूळजी जेठा महाविद्यालयात प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेमध्ये जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील 8 महाविद्यालयातीलसुमारे 86 विद्यार्थी सहभागी झाले. या स्पर्धेसाठी स्वराज्य माझा अधिकार, जल हेच जीवन, कैशलैस होतोय इंडिया आणि अवयवदान आयुष्याचे समाधान या चार विषयांवर पथनाट्य सादर करण्यात आले.

हे ठरले विजयी
स्पर्धेत स्पर्धेचा प्रारंभ मूळजी जेठा महाविद्यालयात झाला सहभागी स्पर्धकांनी बहिणाबाई गार्डन चौक, नवीन बस स्थानक, स्टेडीयम परिसर याठिकाणी पथनाट्य सादर केली. विनोद ढगे, अमरसिंग राजपूत, वैशाली पाटील, दीपक पाटील यांनी परीक्षक म्हणून कार्य संपादन केले. समारोपप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, आमदार चंदूभाई पटेल, नरेश खंडेलवाल, अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळभ स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रताप महाविद्यालय, अमळनेर ने पटकाविला तर द्वितीय क्रमांक मूळजी जेठा महाविद्यालय, तृतीय समाजकार्य महाविद्यालय ठरले.